हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामीनाथन

yongistan
By - YNG ONLINE
स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे गुरुवार,  दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९८ वर्षांचे होते. एकवेळ भारत अन्नधान्य आयातीवर अवलंबून होता. अर्थात धान्य आयात केल्याशिवाय भारतीयांचे पोटच भरत नव्हते. परंतु डॉ. स्वामीनाथन यांनी देशात पहिली हरित क्रांती घडविली. त्यासाठी अधिक उत्पादन देणा-या धानाच्या जाती विकसित केल्या. त्यामुळेच भारत स्वयंपूर्ण देश बनू शकला. त्यामुळेच डॉ. एम. एस. स्वामीनाथन हरितक्रांतीचे जनक बनले.

अमेरिकेच्या पीएल ४८० योजनेतून भारतात त्या काळात मिलो हे धान्य मिळाले. अर्थात अमेरिकेतून येणा-या धान्यावरच भारतीय अवलंबून होते. कारण मागणीच्या तुलनेत देशात अन्नधान्य उत्पादन कमी होत होते. मात्र, यातून डॉ. स्वामीनाथन यांनी देशाला अन्न संकटातून बाहेर काढण्यात आणि शेतक-यांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. स्वामीनाथन यांचे नाव मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन असे आहे. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम येथए झाला. त्यांनी गव्हाचे अधिक उत्पादन करणारे वाण विकसित केले. त्यातूनच देशात गव्हासह अन्नधान्याचे उत्पादन वाढले. डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९६० च्या दशकात देशात हरितक्रांती झाली. त्यामुळे स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. 

भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु भारत देश देशातील जनतेला पोटभर अन्न मिळेल, एवढे उत्पन्न देशात होत नव्हते. मात्र, स्वातंत्र्यानंतर डॉ. स्वामीनाथन यांनी जगाचा पोशिंदा केवळ जगला पाहिजे, असे नव्हे, तर तो सक्षम झाला पाहिजे. अर्थात शेती उत्पादन वाढविल्यास शेतक-यांनाही चांगले दिवस येतील, असा विचार पुढे आला आणि त्याासाठी डॉ. स्वामीनाथन यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यातून शेतीत उत्पादनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी संशोधनही केले. भारताची अर्थव्यवस्था सुधारायची असेल, तर प्रथम शेती सुधारली पाहिजे. मगच देश समृद्ध होईल, याबाबत डॉ. स्वामीनाथन यांनी विश्वास वाटत होता. त्यातूनच त्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले. 

खरे तर डॉ. स्वामीनाथन यांचा पेशा वैद्यकीय होता. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून ते चांगली सेवा करून प्रसिद्ध डॉक्टर होऊ शकले असते. परंतु शेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यात शेती उत्पादन खूप मर्यादित असल्यामुळे त्यांना देशाचे भवितव्य भेडसावत होते. त्यामुळे शेती विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि शेती विकासासाठी त्यांनी नोकरीही सोडली. त्यानंतर त्यांनी कृषी संशोधनाच्या कामाला लागले.
देश स्वातंत्र्यानंतर खूप मर्यादित शेती उत्पादन होत होते. बहुतांश शेतक-यांना वर्षभर पुरेल इतकेही धान्य मिळविता येत नव्हते. देश स्वातंत्र्यानंतर १८ वर्षांनी एक तर उत्पादनात घट किंवा सतत दुष्काळाचे सावट अशीच स्थिती होती. यातून बाहेर काढायचे असेल आणि देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल, तर शेती विकासाला अधिक चालना पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच डॉ. स्वामीनाथन यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या अपार कष्टामुळेच देशात पहिली हरित क्रांती होऊ शकली. 

डॉ. स्वामीनाथन यांनी अन्नधान्य टंचाईच्या काळात देशात पहिले गव्हाचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून काढले. त्यानंतर त्यांनी या वाणाची शेतक-यांना ओळख करून दिली. त्यातून शेतक-यांना नवीन वाण उपलब्ध करून दिले. त्यामुळे देशात गव्हासह अन्नधान्याचे कोठार बनविणे शक्य झाले. अपार कष्टातून याची पायाभरणी करण्याचे काम डॉ. स्वामीनाथन यांनी केले. एक डॉक्टर असताना ते कृषि क्षेत्राकडे का वळले, असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा प्रथम त्यांना आवड होती, असे सांगितले जाते. परंतु आणखी एक कारण त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे १९४३ मधील बंगालचा दुष्काळ आणि देशात अन्नाची कमतरता हे ठरले. त्याच कारणामुळे ते कृषीक्षेत्राकडे वळले. 
१९६० च्या दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या खाईत अडकला होता. त्यावेळी एम.एस. स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने गव्हाचे एचवायव्ही बियाणे विकसित केले. त्यांच्या टिमने विकसित केलेल्या बीजांमुळेच भारतात हरितक्रांती झाली. त्यामुळे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. डॉ. स्वामिनाथन यांनी प्राणीशास्त्र आणि कृषी विज्ञान या दोन्ही विषयांत पदवी प्राप्त केली. याशिवाय त्याच्याकडे ५० हून अधिक सन्मानित अशा डॉक्टरेट पदव्या आहेत. भारत सरकारने १९६७ आणि १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले. स्वामिनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक (१९७२-१९७९) आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (१९८२ ते १९८८) म्हणून काम केले. पुढे ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव राहिले. त्यांनी विविध क्षेत्रात काम केले. परंतु त्यांनी विकसित केलेल्या वाणामुळेच भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनला. 

हवामानात तग धरेल 
असे वाण विकसित
डॉ. स्वामीनाथन यांनी भारतीय हवामानात तग धरेल, असे वाण विकसित केले. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतक-यांना हे वाण देऊन उत्पादनात मोठी भर घालण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.   

गहू, तांदळाचे उत्पादन वाढविले
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतातील गव्हाचे उत्पादन ६० लाख टन होते. हे उत्पादन १ कोटी टनापर्यंत नेण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी जावा लागला. १९६४-६६ मध्ये १.७ कोटी टनांपर्यंत वाढ झाली. एकेकाळी भारताला गहू, तांदूळाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागायचे. तिथे डॉ. स्वामीनाथन यांच्या संशोधनामुळे उत्पादन वाढले.

उत्पादन खर्च अधिक 
५० टक्के नफाची शिफारस
केंद्र सरकारला शेतीमालाचा हमीभाव जाहीर करताना कायमच स्वामीनाथन यांच्या शिफाशींचा विचार करावा लागला. मात्र आजवर एकाही सरकारला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा हमीभाव देता आला नाही. महागाई वाढेल, असे कारण देऊन त्यांच्या शिफारशीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. मोदी सरकारनेदेखील अशीच घोषणा केली होती. मात्र, त्यांनाही असा हमीभाव देता आली नाही.