१५ आॅक्टोबर २०२३

yongistan
By - YNG ONLINE
मिसाईल मॅन डॉ. एपीजे. अब्दुल कलाम यांचा जन्म. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात याच दिवशी केली. टाटा एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे उड्डाणही याच दिवशी झाले. १५ आॅक्टोबर १९९३ रोजी नेल्सन मंडेला यांना शांततेचा नोबेल देण्यात आला. 
-गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ मध्ये याच दिवशी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. सुधारकचा पहिला अंक दसºयाच्या दिवशी बाहेर पडला. यामध्ये इंग्रजी मजकूरही होता. एकाच पत्रात दोन भाषेतील मजकूर दिला जात असे. 
१९३१ : एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ आक्टोबर १९३१ रोजी झाला. एका नावाड्याचा मुलगा देशाच्या सर्वोच्च पदावर पोाहचला. डॉ. कलाम यांनी एरोनॉटिक्स इंजिनिअर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केला. त्यांनी शालेय जीवनात घराघरांत पेपर टाकण्याचे काम केले. अब्दूल काम यांच्या जन्म दिवस जागतिक विद्यार्थीदिन म्हणून पाळला जातो. डॉ. कलाम यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण आणि १९९७ मध्ये भारतरत्न प्रदान केला होता. 
१९३२ :  टाटा एअरलाईन्सचे पहिले उड्डाण जे आर डी टाटा यांनी कराचीहून मुंबईला केले. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयकरण होऊन एअर इंडिया कंपनी अस्तित्त्वात आली.  


२३ आॅगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन
नवी दिल्ली : २३ आॅगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने १३ आॅक्टोबर २०२३ रोजी यासंबंधीची अधिसूचना जारी केली. त्या दिवशी इस्रोने चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. भारताचे चांद्रयान ३ या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून २३ आॅगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ आॅगस्ट रोजी यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर १३ आॅक्टोबरला यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. चांद्रयान ३ च्या यशामुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला, तर दक्षिण धु्रवावर उतरणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक मोहिमेचा परिणाम मानवजातीला पुढील काही वर्षांत लाभदायक ठरेल.