रॉ गुप्तचर संस्थेची २१ सप्टेंबर १९६८ रोजी स्थापना

yongistan
By - YNG ONLINE

परदेशात काम करणारी भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगचा (रॉ) २१ सप्टेंबर १९६८ रोजी स्थापना दिन.  भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धानंतर शत्रू देशाच्या गोटातून माहिती मिळवण्यासाठी रॉ ची स्थापना १९६८ मध्ये करण्यात आली. रॉने आपल्या स्थापनेपासूनच मोठ्या मोहिमा पडद्याआडून पूर्ण केल्या. काही मोहिमांना बळ दिले. १९७१ चे बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सिक्कीमचे एकत्रीकरण यामध्ये रॉचा मोठा वाटा राहिला. 

रिसर्च एंड एनालिसिस विंगच्या स्थापनेपूर्वी ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन माहिती जमा केली जात असे. १९६२ च्या भारत-चीन युद्धात आयबीवर असलेल्या मर्यादा केंद्र सरकारच्या लक्षात आल्या. त्यानंतर १९६८ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पूर्णपणे स्वतंत्र सुरक्षा संस्थेची गरज असल्याचा निर्णय घेण्यात आला. रामेश्वर नाथ काओ हे रॉचे पहिले संचालक होते. 

रामनाथ काओ हे भारत सरकारचे नावाजलेले गुप्तचर होते. रॉ ला परकीय माहिती, मानवी आणि तांत्रिक आणि डायरेक्टर-जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स यांना सीमापार माहिती गोळा करण्यासह समांतर जबाबदारी सोपवण्यात आली होती. रॉच्या अनेक मोहिमांमध्ये काओ यांचा सिंहाचा वाटा होता. रॉ च्या अनेक मोहिमा अनेक वर्षे गुप्त राहिल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणापासून ते इतर संरक्षण विषयक बाबींमध्ये रॉचे मोठे योगदान आहे.