२७ नोव्हेंबर, व्ही. पी. सिंग यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE

१८९५ : नोबेल पारितोषिकांची तरतूद
मानवजातीच्या विकासासाठी योगदान देणा-या शास्त्रज्ञांना दरवर्षी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात १९०१ साली झाली आणि नोबेल यांच्या मृत्यूपत्रात नोंद मात्र २७ नोव्हेंबर १८९५ रोजी करण्यात आली. डायनामाईटचा शोध लावणा-या अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात तशी तरतूद केली. त्यानंतर १८९६ साली त्यांचा मृत्यू झाला.

१००७ : हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 
प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म  २७ नोव्हेंबर १९०७ रोजी प्रयागराज म्हणजे पूर्वीचे अलाहाबाद या ठिकाणी झाला. अमिताभ बच्चन यांचे ते वडील होते. हरिवंशराय यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केले.  त्यानंतर ते इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इंग्रजी साहित्य/कवितेवर संशोधन केले. १९९५ मध्ये तेथून परत आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयात हिंदी तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७६ मध्ये त्यांना पद्मभूषण हा पूरस्कार मिळाला. त्याआधी त्यांना १९६८ मध्ये दो चटणें (कविता संग्रह) साठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हरिवंशराय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ रोजी मुंबईत निधन झाले.
२००८ :  माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे निधन 
विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे १० वे पंतप्रधान होते. २७ नोव्हेंबर २००८ रोजी त्यांचे निधन झाले.  २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले. प्रयागराज जिल्ह्यात २५ जून १९३१ रोजी बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, देहरादून येथून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला व कायदशास्त्राची पदवी घेतली. त्याय पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली. आधी विधानसभेत १९७१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली.