२३ नोव्हेंबर २०२३

yongistan
By - YNG ONLINE

१८८२ : भारताच्या औद्योगिकीकरणाचे शिल्पकार वालचंद हिराचंद यांचा जन्म. ते वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक होते. वालचंद यांचे शिक्षण औरंगाबाद, सोलापूर, मुंबई व पुणे येथे झाले. व्यावसायिक लक्ष्मण बळवंत फाटक आणि वालचंद या दोघांनी मिळून येडशी ते तडवळ हा जवळपास ११ किमी लांबीचा रेल्वेमार्ग बांधला. या रेल्वे मार्गाला बार्शी लाईट रेल्वे म्हणून ओळखले जाते. यासोबतच इतरही कामे केली. त्यांनी सुधारित पद्घती व अवजारे, नवीन प्रगत तंत्रे व दूरदर्शी धोरणे यांचा अंगीकार केल्याने त्यांना यश लाभले. आर्थिक स्वातंत्र्य ही राजकीय स्वातंत्र्याची पहिली पायरी होय, ही त्यांची विचारसरणी होती. दरम्यान त्यांनी नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने वालचंदांनी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही भारतीय जहाजकंपनी स्थापन केली. त्यानंतर विशाखापटनम येथे त्यांनी नौकाबांधणी केंद्र स्थापन केले. यासोबतच म्हैसूरच्या महाराजांच्या संमतीने बंगलोर येथे विमाननिर्मितीचा कारखाना उभारला. 

१९३७ :  भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ सर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे निधन. भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात शिकवत असताना जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. 
विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. वनस्पतीमध्ये होणा-या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. 
१९९२ : आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.