इस्राईल-पॅलेस्टिनी संघर्षाचा इतिहास (भाग २)

yongistan
By - YNG ONLINE
इस्राईल-पॅलेस्टिनी संघर्षाचा इतिहास खूप मोठा आहे. १९६७ मध्ये इस्राईल आणि अरब देशांत ६ दिवसांचे युद्ध झाले. या युद्धात २० हजार अरबी नागरिक, सैन्य ठार झाले. त्यावेळी इस्त्राईलची कमी जीवित हानी झाली. विशेष म्हणजे या युद्धाला इस्राईलनेच तोंड फोडले होते. त्यावेळी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन स्वत:च्या बचावासाठी इजिप्तने हवाई हल्ले सुरू केल्याचे म्हटले होते. या युद्धात इस्राईलने इजिप्तकडून गाझा पट्टी आणि सिनाई द्वीपकल्प, जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि जेरुसलेम आणि सीरियाकडून गोलान हाईटस् जिंकले. हेच इस्राईल-पॅलेस्टिनी संघर्षाचे मूळ आहे. 

कारण सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तकडून इस्राईलने घेतलेला भूभाग पॅलेस्टाईनचा होता आणि तेथे मुस्लिमांची मोठी लोकसंख्या होती. पण येथे इस्राईलची सत्ता होती. हा कब्जा कायम ठेवण्यासाठी त्यांनी पॅलेस्टाईनमधील मुस्लिम ब्रदरहूडचा नेता शेख अहमद यासीन याला मोहरा बनवले. मुस्लिम ब्रदरहुड ही इजिप्तमध्ये स्थापन झालेली एक सुन्नी इस्लामिक संघटना होती, या संघटनेची स्थापना १९२८ मध्ये झाली. त्याचा विस्तार संपूर्ण अरब देशांत झाला. पॅलेस्टाईनमधील कामाची जबाबदारी शेख अहमद यासीनवर होती. नकबाच्या वेळी तो गाझा पट्टीत पोहोचला. वयाच्या १२ व्या वर्षी एका अपघातात त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली, तो नेहमी व्हील चेअरवर राहिला. तो डोळ््यांनीही पाहू शकत नव्हता. परंतु गाझामधील लोकांनी त्याचे ऐकले. 

तो एक इस्लामिक विद्वान बनला होता. नेहमी तो पॅलेस्टाईनच्या लोक कल्याणाविषयी बोलायचा. इस्राईलने शेख अहमद यासीनला आपल्या बाजूने वळवले. त्याला खूप पैसे दिले. जेणेकरून तो गाझामधील गरिबांना मदत करू शकेल. त्यातून पलेस्टाईनमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आणि मग गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांनी त्याला आपला नेता म्हणून स्वीकारले. त्यावेळी अहमद यासिनला आपल्या तालावर नाचविण्याचा इस्राईलचा प्रयत्न होता. त्यासाठी इस्राईलची गुप्तचर संस्था मोसाद काम करीत होती.

तिस-या अरब युद्धानंतर सर्व ठाक ठीक सुरू होते. गाझा पट्टी इस्राईलच्या ताब्यात होती. पण वेस्ट बँकमध्ये इस्राईलविरुद्धची आग धगधगत होती. ही आग तेवत ठेवणा-या संघटनेचे नाव पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन होते. २ जून १९६४ रोजी स्थापन झालेल्या या संघटनेचे उद्दिष्ट अरब गटांची एकता आणि पॅलेस्टाईनचे स्वातंत्र्य होते, ज्याला अरब लीगने मान्यता दिली. इजिप्त, लेबनॉन, जॉर्डन, सीरिया, सौदी अरेबिया आणि इराक या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली होती. 

यासर अराफात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने ६ ऑक्टोबर १९७३ रोजी इस्राईलवर हल्ला केला. तिन्ही युद्धांप्रमाणेच अरब देशांनी इस्राईलविरुद्ध पीएलओची बाजू घेतली. इतिहासाच्या पुस्तकांत या युद्धाला चौथे अरब-इस्रायल युद्ध म्हटले जाते. यावेळीही इस्राईलने अमेरिकेच्या मदतीने युद्ध जिंकले. मात्र, यावेळी इस्राईलचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी इस्राईलने अमेरिकेच्या मदतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमेरिकेत जिमी कार्टर राष्ट्राध्यक्ष झाले, तर इजिप्तमध्ये अन्वर सादात यांचे सरकार आले. त्यावेळी सादात यांनाही पॅलेस्टाईनमुळे इजिप्तचे नुकसान होत असल्याची उपरती झाली. त्यांनी चर्चेसाठी आग्रह धरला. यातून इस्राईल-इजिप्त यांच्यात शांतता करार झाला. त्यामुळे वेस्ट बँकमध्ये स्थापन झालेली पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन एकटी पडली. 

दरम्यान, मोसादने आपल्या गाझा पट्टीतील शेख अहमद यासीन या व्यक्तीला अधिक पैसे देण्यास सुरुवात केली. त्यावरून शेख अहमद यासीनने गाझा पट्टीत संघटित पद्धतीने सत्ता चालवण्यासाठी मुजम्मा-अल-इस्लामिया नावाची संघटना स्थापन केली. तेथे राहणा-या पॅलेस्टिनींना इस्रायली पैशाने मदत करणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर इस्राईलने पैशासोबत शस्त्रेही पाठविली. १९७९ मध्ये इस्राईलने स्वत: मुजम्म-अल-इस्लामियाला मान्यता दिली आणि ही संघटना गाझा पट्टीत मशिदी बांधू शकते, शाळा-हॉस्पिटल बांधू शकते, ग्रंथालये बांधू शकते आणि इस्लामिक विद्यापीठही बांधू शकते, असे सांगून इस्राईलने मुजम्म-अल-इस्लामियाला भक्कम पाठिंबा दिला.