जागतिक स्तरावर चीनने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. चीनमधील तंत्रज्ञान तर झपाट्याने पुढे जात आहे. आता तर चीनने जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट सेवा सुरू केली आहे. या इंटरनेटचा स्पीड कल्पनेच्या पलिकडचा आहे. एका सेकंदात सुमारे १५० एचडी चित्रपट ट्रान्सफर करता येतील, एवढी फास्ट सेवा आहे. देशातील काही शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे जगात सर्वांत वेगवान इंटरनेट सेवा देणारा देश म्हणून चीनची ओळख निर्माण झाली आहे.
चिनी टेक कंपनी हुआवेई टेक्नॉलॉजीने जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट लाँच केले. कंपनीच्या दाव्यानुसार त्याचे नेटवर्क १.२ टेराबिट प्रतिसेकंद वेगाने डेटा प्रसारित करण्यास सक्षम आहे. हुआवेई टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष वांग लेई म्हणाले की, हे नेटवर्क केवळ एका सेकंदात १५० हाय-डेफिनिशन (एचडी) चित्रपटांइतका डेटा ट्रान्समिट करू शकते. याशिवाय ते नेटफ्लिक्सची सर्व जागतिक सामग्री पाठवू शकते. कंपनीने हे नेटवर्क जुलैमध्ये चाचणीसाठी सक्रिय केले होते आणि आता ते अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे. या नेटवर्कने सर्व ऑपरेशनल चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. या यशासाठी सिंघुआ युनिव्हर्सिटी, चायना मोबाईल, हुआवेई टेक्नॉलॉजीज आणि सर्नेट कॉर्पोरेशन यांनी एकत्रितपणे काम केल्याचे वांग लेई यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरियापेक्षा १० पट वेगवान पहिली नेक्स्ट जनरेशन फायबर इंटरनेट सेवा सुरू केली आहे. हे ऑप्टिकल फायबर केबल्ािंगच्या ३,००० किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले एक नवीन बॅकबोन नेटवर्क आहे. हे नेटवर्क उत्तरेकडील बीजिंग, मध्य चीनमधील वुहान आणि दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझो यांना जोडते.
या इंटरनेटचा स्पीड ५ जीच्या तुलनेत अधिक आहे. ५ जी इंटरनेटचा स्पीड हा साधारणपणे २० जीबीपीएस (२० गिगाबाईट्स प्रतिसेकंद) एवढा असतो तर चीनमध्ये सुरू केलेल्या नव्या इंटरनेटचा स्पीड हा तब्बल १.२ टीबीपीएस, म्हणजेच १२०० गिगाबाईट्स प्रतिसेकंद एवढा आहे. शिंघुआ युनिवर्सिटी, चायना मोबाईल, हुआवे टेक्नॉलॉजीस आणि सर्नेट कॉर्परेशन या चार कंपन्यांनी मिळून या इंटरनेट प्रकल्पावर काम केले आहे. जगातील सर्वात प्रमुख वेगवान इंटरनेट सेवांच्या तुलनेत या इंटरनेटचा वेग कमीत कमी १० पटींनी जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. जगातील कित्येक इंटरनेट सेवा या केवळ १०० जीबीपीएस एवढ्या वेगाने इंटरनेट देतात तर अमेरिकेतील सर्वात वेगवान इंटरनेट देखील ४०० जीबीपीएस एवढाच स्पीड देते. या तुलनेत आता नवी इंटरनेट सेवा सध्याच्या इंटरनेट सेवेच्या तुलनेत अधिक पटींनी वाढणार आहे. त्यामुळे ही सेवा अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
३ हजार कि.मी. भागात नेटवर्क
चीनमधील हे हायस्पीड इंटरनेट नेटवर्क तब्बल ३ हजार किलोमीटर भागात पसरले आहे. यासाठी ऑप्टिकल फायबर केबल्सचा वापर केला आहे. बीजिंग, वुहान आणि गुआंगजो या शहरांमध्ये हे नेटवर्क पसरले आहे. हे नेटवर्क जुलै २०२३ मध्ये सुरू करण्यात आले होतं. मात्र, याच्या इतर चाचण्या सुरू होत्या. अखेर सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर दि. २१ नोव्हेंबर रोजी याचे लॉंचिंग करण्यात आले. त्यामुळे इंटरनेट स्पीड चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळाले.