मल्लिका सागर आयपीएल लिलाव करणाऱ्या पहिल्या महिला

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : आयपीएल २०२४ च्या लिलावात यंदा प्रथमच एक भारतीय तरुणी मल्लिका सागर लिलाव साकारत आहे. १९ डिसेंबर २०२३ रोजी हा लिलाव साकारण्यात आला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने लिलाव साकारला आहे. आयपीएलचा लिलाव प्रथमच भारताबाहेर होत आहे. दुबईत याचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी चारु शर्मासारखा भारतीय चेहरा आयपीएलचा लिलाव साकारताना पाहायला मिळाला. पण यावेळी मल्लिका सागरने प्रथमच आयपीएलच्या लिलावात महत्वाची भूमिका बजावली. 
मल्लिका ही लिलावाच्या विश्वात नवीन नाही. तिला तब्बल २५ वर्षांचा लिलाव साकारण्याचा अनुभव आहे. आतापर्यंत कलेच्या क्षेत्रात तिचे नाव होते. आतापर्यंत फोटो, चित्रे आणि अन्य महागड्या गोष्टींच्या लिलावात मल्लिका ही पाहायला मिळाली. तसेच ती क्रीडा क्षेत्राला नवीन नाही. वयाच्या २६ व्या वर्षी मल्लिकाने लिलावाच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. क्रिस्टीज या ऑक्शन करणा-या कंपनीत तिने प्रथम काम केले. त्यानंतर या कंपनीत ती लिलाव साकारणारी पहिली भारतीय महिला बनली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. क्रीडा क्षेत्रातही तिने लिलाव साकारले आहेत. यापूर्वी प्रो कबड्डीचा लिलाव तिने साकारला. त्याचबरोबर बीसीसीआयच्या महिला प्रीमिअर लीगचा लिलावही तिने हाताळला होता. त्यानंतर आता मल्लिकाला ही मोठी जबाबदारी देण्यात आली. या आयपीएलमध्ये एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या लिलावात २६३ कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. त्यामुळे या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.