बॅडमिंटनपटू चिराग-सात्विकला खेलरत्न

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी बुधवार, दि. २० डिसेंबर २०२३ रोजी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात दिले जाणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत.
क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहेत तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले जाईल. प्रज्ञानानंदसह अनेक बुद्धिपळपटू घडविणारे  प्रशिक्षक आरबी. रमेश यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. दरवर्षी क्रीडा दिनी म्हणजेच २९ आॅगस्टला या पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदा ९ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींनुसार या क्रीडापटूंची निवड केली. यात बॅडमिंटन दुहेरीमधील आघाडीची जोडी सात्विक आणि चिराग यांना प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या जोडीने आशियाई, राष्ट्रकुल, थॉमस करंडक स्पर्धेत सुवर्णसोबत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.
यासोबतच पदार्पणातच आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णयश मिळविणारी साताºयाची तिरंदाज आदिती स्वामी आणि तिचा सहकारी ओजस देवताळे याला अर्जुन क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. तिने तिरंदाजीतील कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ओजसनेही जागतिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक आणि मिश्र दुहेरी आणि सांघिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली. यादीतून वगळल्यानंतर बीसीसीआयच्या आग्रहामुळे विश्वचषकमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाºया मोहमद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.

दोघांना खेलरत्न
चिराग चंद्रशेखर शेट्टी, रँकीरेड्डी सात्विक साईराज हे दोघेही बॅडमिंटनपटू असून या दोघांना २०२३ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 

२६ जणांना अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर एम (अ‍ॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कब्बडी), रितू नेगी (कब्बडी), नसरीन (खो-खो), सुश्री ंिपकी (लॉन बाऊल्स), ऐश्वरी प्रतापसिंग तोमर (शूटिंग), सुश्री ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), सुश्री अँटिम (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग) अशा एकूण २६ जणांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.                    द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅराअ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब)

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई ( कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस).

ध्यानचंद जीवनगौरव
मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)