१७ डिसेंबर १९२८ रोजी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. याबरोबरच २०१४ मध्ये अमेरिका आणि क्युबाने अनेक दशकांनंतर पुन्हा राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्याची घोषणा केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे नेते राऊल कॅस्ट्रो यांनी राजनैतिक संबंध पुन्हा जोडण्याची घोषणा केली. १७ डिसेंबर रोजी इतिहासात नोंदलेली दुसरी मोठी घटना १९०३ मध्ये घडली. राईट बंधू ऑर्व्हिल आणि विल्बर यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये राइट फ्लायर नावाच्या विमानाने यशस्वी उड्डाण केले.
१९०३ : राईट बंधूंनी प्रथमच द फ्लायर नावाच्या विमानाचे यशस्वी उड्डाण केले. राईट बंधू ऑर्व्हिल आणि विल्बर यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये राइट फ्लायर नावाच्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. त्यांचे विमान १२० फूट उंचीवर १२ सेकंदांपर्यंत उड्डाण करू शकले. त्यानंतर १९०५ मध्ये पहिले विमान तयार करण्यात आले. १७ डिसेंबर १९०३ रोजी किलडेव्हिल हिल्सनजीक चार यशस्वी उड्डाणे केली. त्यांतील पहिल्या उड्डाणात ऑर्व्हिल हे चालक होते. त्यांनी १२ सेकंदात ३६ मी. अंतर कापले. शेवटच्या सर्वांत जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते. त्यांनी ५९ सेकंदांत २५५ मी. अंतर कापले. ‘किटी हॉक’ याच लोकप्रिय नावाने ओळखण्यात येणारे हे विमान पुढे १७ डिसेंबर १९४८ रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले.
१९२८ : क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी जेम्स साँडर्स याची हत्या केली
१७ डिसेंबर १९२८ रोजी क्रांतिसिंह भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. जेम्स स्कॉट याला ठार मारण्याचे नियोजन होते. परंतु चुकून साँडर्स बळी पडला. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिका-याला मारले.