नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. त्यातच रविवार, दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करून नव्याने निवडणुका घेतल्या. निवडणुकादरम्यान ब्रजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी अध्यक्षपदासाठी मैदानात उतरविले. त्यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळविणाºया साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी ब्रजभूषण सिंह यांच्या निकटवर्तीयाला उमेदवार देण्यास विरोध केला आणि एखाद्या महिला कुस्तीपटूला अध्यक्ष करावे, अशी मागणी केली. परंतु मोदी सरकारने फारशी दखल घेतली नाही. तत्पूर्वी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केवळ आश्वासन दिले. परंतु या निवडणुकीत पुन्हा ब्रजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. तेव्हा ब्रजभूषण सिंह पडद्यामागे राहून महिला कुस्तीपटूंविरोधात पुन्हा कट-कारस्थान करू शकतो. या नाराजीतून साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंह आदी कुस्तीपटूंनी बंडाचा पवित्रा घेतला. साक्षी मलिकने तडकाफडकी कुस्ती सोडली. बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंह यांनी सरकारकडे पद्मश्री परत केला. या सगळ््या रामायणानंतर मोदी सरकारला जाग आली असून, आता राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करीत नूतन अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले.
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर कारवाई करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. कुस्तीचे आयोजन करताना राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या नियमांचे पालन केले नसल्याचे कारण दिले आहे. मात्र, कुस्तीपटूंनी कुस्ती सोडणे, पद्मश्री पदक परत करणे या माध्यमातून सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्याचा सपाटा लावल्यामुळे मोदी सरकारला याची दखल घ्यावी लागली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रीय कुस्ती महासंघाची थेट मान्यताच रद्द करून टाकली आणि नूतन अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनाही निलंबित केले आहे. संजय सिंह हे ब्रजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी अद्याप अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला नव्हता. तत्पूर्वीच केंद्र सरकारने ही कारवाई केली.
या निवडीवर ११ महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंह या कुस्तीपटूंनी तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच साक्षी आणि विनेशने कुस्तीला कायमचा रामराम ठोकला होता. तसेच बजरंग पुनिया यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून कुस्तीमधील राजकारणाचे वाभाडे काढले होते. तसेच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पद्मश्री रस्त्यावर ठेवून दिला होता.