शायरीचा बादशाह अशी ओळख असलेल्या मिर्झा गालीब यांची आज जयंती आहे. तसेच भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदेखील आजच्याच दिवशी झालेला. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा आज वाढदिवस याच दिवशीचा. याच दिवशी जन गण मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा गायिले.
१७०७ : शेर-ओ-शायरीचा बादशाह मिर्झा गालिब यांचा जन्म. २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथील काला महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते. मिर्झा असदुल्लाह बेग खान असे गालिब यांचे पूर्ण नाव. अत्यंत हालाखीच्या स्थितीत त्यांचे बालपण गेले. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केले. त्यांनी जगण्यातले चटकेही शब्दबद्ध केले, शायरीतून व्यक्त केले. लहानपणी वडील गेल्यावर त्यांच्या काकांनी त्यांना सांभाळले. वयाच्या १३ व्या वर्षी गालीब यांचा विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेले. मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादूर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही ते राहिले. इश्क, मोहब्बत, वफा, लफ्ज अशा असंख्य शब्दांमधून जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणा-या गालिब यांचे निधन वयाच्या ७१ व्या वर्षी म्हणजे १५ फेब्रुवारी १८७९ रोजी दिल्लीतील चांदनी चौक भागातील गली कासिम जानमध्ये झाले.
१८२२ : लुई पाश्चर यांचा जन्म
लुई पाश्चर हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या आमूलाग्र शोधांसाठी ते ओळखले जातात. लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते मायक्रोबायोलॉजीचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत
१८९८ : डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म
डॉ. पंजाबराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. अमरावतीतील पापळ या गावी त्यांचा जन्म झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. १९३६ च्या निवडणुकीनंतर ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषिमंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात १००० च्या वर शाळा आहेत.
१९११ : जन गण मन पहिल्यांदा गायले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना
१९४५ : २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. आयएमएफच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही भूषवले.
१९६५ : भाईजान सलमान खानचा जन्म
२००७ : पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या. बेनिझिर भुट्टो या पाकिस्तानच्या दोन वेळा पंतप्रधान राहिल्या होत्या. २७ डिसेंबर २००७ रोजी, रावळंिपडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला.