२१ जानेवारी : काॅपी राईट कायदा लागू, राष्ट्रीय अलिंगन दिन

yongistan
By - YNG ONLINE

आजच्या दिवशी भारताचे माजी रेल्वे मंत्री अर्थतज्ज्ञ प्रा. मधू दंडवते यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. २१ जानेवारी हा राष्ट्रीय अलिंगन दिन म्हणूनही साजरा केला जातो. तसेच कॉपी राईटचा नियमही आजच्या दिवशीच लागू झाला.

राष्ट्रीय आलिंगन दिन
२१ जानेवारी हा राष्ट्रीय आलिंगन दिन म्हणून साजरा केला जातो. कॅनडा, जर्मनी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय आलिंगन दिवस साजरा केला जातो. 
 

१९२४ : प्रा. मधू दंडवते यांचा जन्म 
भारताचे माजी रेल्वेमंत्री अर्थतज्ज्ञ प्रा. मधू दंडवते यांचा जन्म २१ जानेवारी १९२४ रोजी झाला.  त्यांचा मृत्यू १२ नोव्हेंबर २००५ रोजी झाला. 

१९४३ : क्रांतिकारक हेमू कलाणी यांना फाशी 
क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांचा जन्म २३ मार्च १९२३ रोजी झाला होता. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले, तेव्हा हेमू कलाणी यांनी त्यात उडी घेतली. १९४२ मध्ये त्यांना गुप्त माहिती मिळाली की ब्रिटिश सैन्याच्या शस्त्रास्त्रांनी भरलेली ट्रेन रोहरी शहरातून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी कलानींसह त्यांच्या साथीदारांनी रेल्वे रुळ विस्कळीत करण्याचा डाव आखला. त्यावेळी तेथे तैनात पोलिस कर्मचा-यांंनी त्यांना पाहिले आणि हेमू कलानींना अटक केली आणि त्यांचे बाकीचे साथीदार पळून गेले. त्यानंतर हेमू कलाणी यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळी त्यांचे वय अवघे १९ वर्ष होते.

१९५८ : कॉपीराईटचा नियम लागू   
भारत सरकारकडून कॉपीराईटचा नियम आजच्या दिवशीच लागू केला. भारतीय कॉपीराइट कायदा १९५८ चा उद्देश व्यावसायिकतेला प्रोत्साहन देणे हा नव्हता तर लेखक, प्रकाशक आणि ग्राहक यांच्या हितासाठी योग्य संतुलन स्थापित करणे हा होता. संगणक, इंटरनेट इत्यादी तांत्रिक माध्यमांच्या या युगात लेखक आणि प्रकाशकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, भारत सरकारने त्यात सुधारणा करण्यासाठी कॉपीराइट हक्क दुरुस्ती विधेयक २०१० आणण्याचा निर्णय घेतला.

१९८६ :  अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जन्म  सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली होती. त्याचा पहिला शो स्टार प्लसचा रोमँटिक नाटक किस देश में है मेरा दिल (२००८). त्यानंतर झी टीव्हीच्या लोकप्रिय शो पवित्र रिश्ता (२००९-११) मध्ये त्याची प्रमुख भूमिका होती. त्याने २०१३ मध्ये काय पो चे या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटात काम केले. २०१६ च्या एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने महेंद्रसिंह धोनीची मुख्य भूमिका साकारली.  १४ जून २०२० रोजी सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
१८९४ : माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. ते   कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते होते.  
१९७२ : मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
२००० : फायर अँड फरगेट; या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.