व्यंकय्या नायडू, चिरंजीवी यांना पद्मविभूषण

yongistan
By - YNG ONLINE

मिथून चकवर्ती, प्यारेलाल यांना पद्मभूषण, १३२ जणांचा गौरव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली असून, त्यामध्ये माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुपरस्टार अभिनेता चिरंजिवी यांना पद्मविभूषण, मिथून चक्रवर्ती, संगीतकार प्यारेलाल यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. एकूण ५ जणांना पद्मविभूषण आणि १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 
पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या १३२ जणांमध्ये ३० महिलांचा समावेश आहे. ८ जण विदेशी एनआयआर, पीआयओ, ओसीआय प्रवर्गातील आहेत. तसेच ९ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशात पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये झाली. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. पद्मविभूषण हा पुरस्कार उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो. उच्च श्रेणीतील अतुलनीय सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय सेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येते.
उदय देशपांडेंना पद्मश्री
मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत ५० देशांतील ५ हजारांहून अधिक लोकांना मल्लखांबचे प्रशिक्षण दिले.


१) पद्मविभूषण-५

व्यंकय्या नायडू
कोनिडेला चिरंजिवी
वैजयंतीमाला बाली
बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर)
पद्मा सुब्रमण्यम

२) पद्मभूषण-१७
एम. फातिमा बिवी (मरणोत्तर), होरमुसजी कामा, सिताराम जिंदाल, यंग लियू, अश्विन मेहता, सत्यव्रत मुखर्जी (मरणोत्तर), राम नाईक, तेजस मदुसूदन पटेल, ओलांचेरी राजगोपाल, दत्तात्रय मायायो ऊर्फ राजदत्त, तोगडन रिनपोचे (मरणोत्तर), प्यारेलाल शर्मा,
कुंदन व्यास, चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर, उषा उतुप, विजयकांत (मरणोत्तर) 

पद्मश्री
उदय देशपांडे, मनोहर डोळे, जहिर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोरपारिया, शंकरबाबा पापलकर, खलिल अहमद, बद्रप्पन एम, कलुराम बामनिया, रिजवाना चौधरी बन्न्या, नसीम बानो, रामलाल बर्थ, गीता राय बर्मन, पार्बती बरुह, सर्वेश्वर बसुमात्री, सोम दत्त बट्टू, तकडिरा बेगम, सत्यनारायण बेलेरी, ड्रोना बुयन, अशोककुमार बिस्वास, रोहन बोपन्ना, स्मृती रेखा चकमा, नारायण चक्रवर्ती, ए वेलू आनंद चारी, राम चेत चौधरी, के चेलाम्मल, जोशना चिनप्पा, चारलोटे चोपिन, रघुवीर चौधरी, जो डी क्रुझ, गुलाम नबी दार, चित्त रंजन देववर्मा, प्रेमा धनराज, राधाकृष्ण धिमन, मनोहर कृष्ण डोले, पियरी सायलवेन फिलिओजट, महावीरसिंग गुड्डू, अनुपमा होसकेरे, याजदी मानेकशा इटालिया, राजाराम जैन, जानकीलाल, रतन कहार, यशवंतसिंग कथोच, गौरव खन्ना, सुरेंद्र किशोरे, दसारी कोंडप्पा, श्रीधर माकम कृष्णमूर्ती, यानूंग जमोह लेगो, जोर्डन लेप्चा, सत्येंद्रसिंग लोहिया, विनोद महाराणा, पूर्णिमा महातो, उमा माहेश्वरी डी, दुखू माझी, रामकुमार मल्लिक, हेमचंद मांझी, सुरेंद्र मोहन मिश्रा (मरणोत्तर), अली मोहमद, चामी मुर्मू, ससिंद्रन मुतुवल, जी नाचीयार, किरण नादर, पक्रावूर चित्रण नामबुद्रीपाद (मरणोत्तर), नारायणन ईपी, शैलेश नायक, फ्रेद निगेरिट, हरी ओम, भागवत पधान, सनातन रुद्रपाल, राधेशाम पारिक, दयाल मावजीभाई परमार, विनोदकुमार पसायत, सिल्बी पसाह, शांतीदेवी पासवान, संजय अनंत पाटील, मुनी नारायण प्रसाद, के. एस. राजन्ना, भगवतीलाल राजपुरोहित, रोमालो राम, नवजीवन रस्तोगी, निर्मल रिषी, प्राण सबरवाल, ओमप्रकाश शर्मा, रामचंद्र सिंग, हरविंदर सिंग, गोदावरी सिंग, रविप्रकाश सिंग, उर्मिला श्रीवास्तव, माया टंडन, किरण व्यास, बाबूराम यादव, जगेश्वर यादव आदी