चंद्रावर पाऊल ठेवणारा जपान पाचवा देश

yongistan
By - YNG ONLINE
टोकियो : जपानच्या मून मिशन अंतर्गत चंद्राकडे झेपावलेले मून स्नायपर यानाने अखेर दि. १९ जानेवारी २०२४ रोजी चंद्रावर पाऊल ठेवले. जपानसाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली असून यामुळे चंद्रावर पाऊल ठेवणारा जपान हा जगातील पाचवा देश ठरला. जपानची स्पेस एजन्सी जेएएक्सएने हे यान प्रक्षेपित केले होते. पिन पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे जपानने ही मोहिम फत्ते केली. 

अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन आणि भारत ही एकमेव राष्ट्रे आहेत, ज्यांनी आतापर्यंत ही कामगिरी केली. त्यात आता जपानचा समावेश झाला आहे. चंद्र विषुववृत्ताच्या अगदी दक्षिणेला असलेल्या एका विवराच्या उतारावर पिन पॉइंट तंत्रज्ञान वापरून मून स्नायपर हे यान उतरले आहे. इतर कोणत्याही राष्ट्राने हे साध्य केलेले नाही. जपानकडे हे पीन पॉइंट तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. यामुळे आम्हाला आर्टेमिससारख्या आगामी आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये मोठा फायदा होणार आहे, असे म्हटले.

पिन पॉईंट तंत्रज्ञानाचा फायदा काय?
या पिनपॉईंट तंत्रज्ञानाचा वापर जपानने दोन लघुग्रहांवर यशस्वीरित्या प्रोब उतरवण्यासाठी यापूर्वी केला होता. या तंत्रज्ञानाचा फायदा सांगताना म्हटले की, या पिन पॉईंट उच्च-सुस्पष्टता तंत्रज्ञानामुळे भविष्यात चंद्रावरील डोंगराळ भाग तसेच ध्रुवांवरील ऑक्सिजन, इंधन आणि पाण्याचा संभाव्य स्रोत शोधण्यात मदत होणार आहे. यापूर्वी जपानच्या दोन चांद्रमोहिमा अपयशी ठरल्या होत्या.