कॅरम, स्नूकर शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्काराच्या यादीत

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : प्रतिनिधी
सुधारित शासन निर्णयात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतील ४४ क्रीडा प्रकारांपैकी इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर व यॉटींग या सात प्रकारांना वगळण्यात आले होते. या वगळण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांसह जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणा-या एरोबिक्स व अ‍ॅक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा पुन्हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत समावेश करण्याचे निर्देश महाराष्ट्र ऑंिलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४ रोजी दिले. तसेच यंदाच्या (वर्ष २०२२-२०२३) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने तातडीने मागवून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या सुधारित शासन निर्णयातून पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतील ४४ क्रीडा प्रकारांपैकी इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्रूकर व यॉटींग या सात प्रकारांना वगळण्यात आले होते. या खेळांचा पुन्हा पात्रता यादीत समावेश करण्यासह जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणा-या एरोबिक्स व अ‍ॅक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत समावेश करण्याची मागणी होती.