१६ व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी पानगडिया

yongistan
By - YNG ONLINE

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया यांची १ जानेवारी २०२४ रोजी १६ व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अर्थ मंत्रालयाचे सहसचिव ऋत्विक रंजनम पांडेय हे आयोगाच्या सचिवपदी असतील. अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या नियुक्तींची घोषणा केली.
वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य हे कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून ३१ ऑक्टोबर २०२५ किंवा वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची तारीख यापैकी जे आधी असेल ते, या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. या अहवालाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल.