बांगलादेश निवडणूक, ३०० पैकी २२४ जागा जिंकल्या
ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दि. ८ जानेवारी २०२४ रोजी मतमोजणी झाली. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या निवडणुकीत शेख हसिना यांच्या पक्षाला ३०० पैकी २०० जागांवर विजय मिळाला तर शेख हसीना स्वत: २ लाख ४९ हजार ४९६ मतांनी विजय मिळवला आहे.
बांगलादेशमध्ये शेख हसिना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पाचव्यांदा शेख हसीना पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने ३०० जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. २००९ पासून बांगलादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्या अगोदर जून १९९६ ते ते जुलै २००१ या काळात शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. त्या काळात भारतीय अर्थव्यवस्था सुधारली आणि गरिबी रेषेतील लोकांचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाले. परंतु २००९ पासून शेख हसिना यांच्याकडेच सत्तेची सूत्रे आहेत. त्यात आताही त्यांचाच पक्ष निवडून आला. शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने ३०० संसदीय जागांपैकी २२४ जागा जिंकल्या. बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी ६२ जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, उर्वरित दोन जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे.
हसीना आठव्यांदा जिंकल्या