विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी एकट्याने भारताचा किल्ला लढवला. यशस्वीने या सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याने या सामन्यात इतिहास रचला. आज शतक झळकावत विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला. यशस्वीने ही कामगिरी वयाच्या २२ व्या वर्षी केली.
सचिन, सुनील गावस्कर
यांच्या विक्रमाची बरोबरी
यशस्वीने एकाकी झुंज देत हे शतक झळकावले. या कसोटी स्पर्धेतील त्याचे हे दुसरे शतक ठरले. यशस्वीने सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वयाच्या २२ व्या वर्षी दोन शतकं करण्याचा विक्रम यापूर्वी सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. यशस्वीने वयाच्या २२ व्या वर्षी मायदेशात आणि परदेशात शतक झळकावण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने यापूर्वी २२ व्या वर्षी मायदेशात आणि परेदशात शतक झळकावले होते. रवी शास्त्री यांनीही अशीच कामगिरी २२ व्या वर्षीही केली होती. त्यामुळे यशस्वीने आता या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.