चंफाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री

yongistan
By - YNG ONLINE
विश्वासदर्शक ठरावासाठी १० दिवसांची मुदत
रांची : वृत्तसंस्था
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) विधिमंडळ पक्षाच्या नेत्या चंपाई सोरेन यांनी दि. २ फेब्रुवारी २०२४ (शुक्रवारी) रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.
ईडीच्या कारवाईमुळे हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून चंपाई सोरेन यांची निवड झाली. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले नव्हते. परंतु दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदासह मंत्रिपदाची शपथ दिली. त्यांना आता १० दिवसांत बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे.