शक्तिकांत दास सर्वोत्कृष्ट बॅंकर्स

yongistan
By - YNG ONLINE

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना २०२३ साठी जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले होते. अमेरिकन आर्थिक मासिक ग्लोबल फायनान्सने दास यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल अ+ ग्रेड दिला होता.
ग्लोबल फायनान्सने देशाचे चलन स्थिर ठेवणे, चलनवाढ नियंत्रित करणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि व्याजदरांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करणे, यासारख्या घटकांवर आधारित केंद्रीय बँक गव्हर्नरचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये गव्हर्नर शक्तीकांत दास उत्कृष्ट ठरले होते. त्यामुळे शक्तीकांत दास यांचा प्रवास जाणून घेणे प्रेरणादायी आहे.

शक्तीकांत दास यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५५ रोजी ओरिसात झाला. बीए पदवी प्राप्त केल्यानंतर दास यांनी इतिहासात पदव्युत्तर म्हणजेच एमए पदवी प्राप्त केली. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शांत स्वभावाची व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

शक्तीकांत दास १९८० च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी २०१३ ते २०१४ पर्यंत भारताचे खत सचिव, २०१४ ते २०१५ पर्यंत भारताचे महसूल सचिव आणि २०१५ ते २०१७ पर्यंत भारताचे आर्थिक व्यवहार सचिव अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.

नोटाबंदीच्या काळात शक्तीकांत दास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते मुख्यत: केंद्र आणि राज्याच्या आर्थिक आणि वित्त विभागात कार्यरत होते. आधी मोदी सरकारने काळ््या पैशांविरोधात उचललेल्या पावलांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यानंतर वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीवर एकमत निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
५०० आणि २ हजार रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आणि त्याचा पुरवठा वाढवण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. शांत स्वभावाची व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे.