मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोमवार, दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज उधास यांनी गझल गायकीत एक वेगळे स्थान निर्माण केले. १९८० मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी अल्बम गाजले. नाम चित्रपटातील चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरांत पोहोचले. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.