नवी दिल्ली : कांदा हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. कांदा हा ५ हजार वर्षांपासून वापरात असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच कांद्याची उत्पत्ती जुनी आहे. कांदा सगळ््यात आधी कुठे निर्माण झाला. त्यानंतर तो जगभरात कसा पसरला याचा इतिहास रंजक आहे. कांदा प्रथम मध्य आशियातून आला. सध्या जगातील तब्बल १७५ देशांत कांद्याचे उत्पादन होते. तरीही कांद्याबाबत सरकारची सातत्याने धरसोड वृत्ती पाहायला मिळते.
कांद्याचे उत्पादन जगभरातील देशांत घेतले जाते. भारत आणि चीनमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच कांदा सर्वाधिक खाणा-या देशांत भारत-चीनचा समावेश होत नाही. कांदा मध्य आशियामधून आला असे तज्ज्ञ सांगतात. सर्वात आधी कांदा इराण आणि पश्चिम पाकिस्तानात घेतला गेला, असे काही रिपोर्ट सांगतात. सुरुवातीला जंगली कांद्याचा शोध लागला. त्यानंतर हळूहळू त्याचा खाण्यात वापर वाढला. कांद्याची रितसर शेती सुरू झाली. काही तज्ज्ञांनी कांदा पाच हजार वर्षांपेक्षा जुना आहे. सुरुवातीच्या काळात विविध जंगलामध्ये हे उगवत होता, असा दावा केला आहे.
अन्नाला चव देण्यात कांदा महत्वाची भूमिका बजावतो. चरक संहितेत कांद्याचे विविध फायदे सांगण्यात आले. काही आजारांत औषध म्हणून देखील कांद्याचा वापर होतो. कांद्याला खूप काळ साठवून ठेवले तरी तो खराब होत नाही. इजिप्तमध्ये कांद्याला खूप महत्व आहे. याला देवाच्या प्रार्थनेचे प्रतीक मानले जाते. इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याला पुरताना त्याच्यासोबत कांदा ठेवला जातो.
१७५ देशांत कांद्याचे उत्पादन
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार १७५ देशांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गव्हाचे उत्पादन घेणा-या देशांपेक्षा कांद्याचे उत्पादन घेणा-या देशांची संख्या दुप्पट आहे. भारत, चीन, अमेरिका, इजिप्त, तुर्की आणि पाकिस्तानात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होते.
तजाकिस्तानमध्ये सर्वाधिक वापर
तजाकिस्तानमध्ये सर्वाधिक कांद्याचा वापर होतो. प्रति व्यक्ती ६० किलो कांदा वापर या देशात होतो. त्यानंतर नायजेरिया आणि सूदान या देशांचा क्रमांक लागतो. या देशात कांद्याला खूप मागणी आहे.