जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात १४ जानेवारीलाच सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणा-या बसवर स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. त्यात ४० जवान शहीद झाले होते. १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डे : १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. तिस-या शतकात रोमच्या एका क्रूर सम्राटाने प्रेमीयुगुलांवर अत्याचार केले, तेव्हा धर्मगुरू व्हॅलेंटाईनने सम्राटाची आज्ञा मोडून प्रेमाचा संदेश दिला म्हणून त्याला कैद करून १४ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली. प्रेमासाठी बलिदान देणा-या या संताच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
१८७६ : बेल यांचा टेलिफोन पेटंटसाठी अर्ज
३ मार्च १८४७ रोजी एडिनबर्ग स्कॉटलंड येथे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला. १४ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांनी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला आणि ७ मार्च १८७६ रोजी त्यांना हे पेटंट मिळाले. टेलिफोन पेटंट हे जगातील सर्वात वादग्रस्त पेटंटपैकी एक असल्याचे म्हटले जाते. कारण जेव्हा बेलने टेलिफोनच्या शोधाची घोषणा केली तेव्हा ६०० हून अधिक लोकांनी त्यावर दावा केला होता. यात बेल यांचाच विजय झाला.
१९३३ : अभिनेत्री मधुबाला यांची जयंती
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणा-या अभिनेत्री मधुबालाच जन्म १४ फेब्रुवारी १९३३३ रोजी झाला. मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम नहलवी असे होते. तिला बेबी मुमताज म्हणूनही ओळखले जात असे. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांचे निधन झाले.
१९५२ : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची जयंती
सुषमा स्वराज यांजा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील होत्या. शिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्या होत्या. त्या २०१४ ते २०१९ पर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या. इंदिरा गांधीनंतर हे पद घेणा-या त्या दुस-या महिला होत्या. त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. १९९८ मध्ये दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. ६ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
२००५ : यूट्यूब नावाची वेबसाइट नोंदणीकृत
स्टीव्ह चेन, चॅड हर्ले आणि जावेद करीम यांनी व्हिडिओ शेअर करण्यासाठी यूट्यूब नावाची वेबसाइट नोंदणीकृत केली. यूट्यूब एवढे लोकप्रिय झाले आहे की आज दरमहा सुमारे एक अब्ज लोक त्याचा वापर करतात. अनेक लोक व्हिडीओ बनवून याच यूट्यूबमधून लाखो रूपये कमावत आहेत.
२०१९ : पुलवामा हल्ल्यात ४० जवानांचा मृत्यू
भारताच्या इतिहासात १४ फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे २५०० जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा ७८ बसमधून जात होता. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला त्यावेळी रस्त्याच्या वाजूने येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणा-या वाहनावर आदळली. कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला आणि या प्राणघातक हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले.