चालू घडामोडी (१ व २ जून)

yongistan
By - YNG ONLINE

१ जून 
१) भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेले किती टन सोने भारतात आणले
उत्तर : १०० टन
२) भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेला आहे?
उत्तर : ८२२ टन
३) आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या नोटांचा एकूण वाटा किती टक्के?
उत्तर : ८६ टक्के
४) २०२३-२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढली आहे. (राष्ट्रीय सांख्यिकीची आकडेवारी)
उत्तर : ८.२ टक्के
५) जागतिक मिल्क डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर : १ जून
६) चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : तामिळनाडू
७) जगप्रसिद्ध काजवा महोत्सव राज्यातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो?
उत्तर : अकोला
.................................................................
२ जून
१) सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने किती जागा जिंकल्या?
उत्तर : ३१
२) सिक्कीम डेमॉक्रेटिक फ्रंट पक्षाला किती जागा मिळाल्या?
उत्तर : ०१
३) अरुणाचल विधानसभेत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या?
उत्तर : भाजप, ६० पैकी ४६ जागांवर विजय, एनपीपी पक्षाने एकूण ५ जागा जिंकल्या.
४) माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे कोणत्या देशाचे अंतराळ यान चंद्राच्या दुर्गम भागात उतरले?
उत्तर : चीन 
५) कोणत्या राज्यातील ताशीगंगा हे जगातील सर्वांत उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
६) मे महिन्यातील जीएसटी संकलन किती लाख कोटी झाले?
उत्तर : १.७३ लाख कोटी
७) यूईएफए चॅम्पियनशीप फुटबॉल लिगचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : रेयाल माद्रिद
८) जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात येणारा २०२४ चा नेल्सन मंडेला पुरस्कार कोणत्या संस्थेला दिला?
उत्तर : एनआयएमएचएनएस, बंगळुरू
९) दिनेश कार्तिक याने कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती जाहीर केली?
उत्तर : क्रिकेट
१०) आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये किती संघाचा समावेश आहे?
उत्तर : २०
११) आंध्र, तेलंगणाची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी आहे?
उत्तर : हैदराबाद 
१२) सहिवाल गायीचा संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला?
उत्तर : पुणे