इटानगर : भाजपचे नेते पेमा खांडू यांनी सलग तिस-यांदा अरुणचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शुक्रवार, दि. १४ जून २०२४ रोजी शपथ घेतली. तवांग जिल्ह्यातील मुक्तो विधानसभा मतदारसंघातून खांडू यांची बिनविरोध निवड झाली होती. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल के. टी. पारनाईक यांनी खांडू यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी अन्य ११ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
माजी मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचे पुत्र आणि मोनपा समुदायाचे नेते पेमा खांडू (४४) हे पहिल्यांदा २०१६ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी अनेक आमदारांना सोबत घेत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि पीपीएला साथ दिली. पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे बडे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच रणनीतीनुसार राज्यात निवडणूक लढविली. त्यामुळे ते तिस-यांदा मुख्यमंत्री झाले.