यूजीसी नेट परीक्षा रद्द

yongistan
By - YNG ONLINE
परीक्षेत गोंधळ, शिक्षण मंत्रालयाने घेतला निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १८ जून २०२४ रोजी घेण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवार, दि. १९ जून २०२४ रोजी केंद्र सरकारने घेतला. परीक्षा झाल्यानंतर दुस-याच दिवशी यूजीसीला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरकडून परीक्षेसंदर्भात काही गंभीर इनपूट मिळाले. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आधीच नीट यूजी परीक्षेतील ग्रेस गुणांवरून रणकंदन सुरू असतानाच यूजीसी नेटच्या परीक्षेत पेपर लिकचा प्रकार घडल्याने या परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता याचा सीबीआय तपास होणार आहे.
एटीएकडून दोन दिवसांपूर्वी यूजीसी-नेट परीक्षा देशातील विविध शहरांत दोन टप्प्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा ओएमआर मोडमध्ये झाली. मात्र, १४ सीकडून दिलेल्या माहितीत या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत तडजोड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच शिक्षण मंत्रालयाने यूजीसी-नेट जून २०२४ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 
यूजीसी-नेट परीक्षेचा 
तपास सीबीआयकडे
नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर केंद्र सरकारने सावध पवित्रा घेत मंगळवारी झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे.