सासणे, सौदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE
समशेर आणि भुतबंगला, उसवण या कादंब-यांची निवड 
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाच्या साहित्य अकादमीच्या २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये मराठी भाषेतील साहित्याचा गौरव करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार भारत सासणे यांचा बालसाहित्यासाठी आणि देविदास सौदागर यांचा युवा साहित्यासाठी सन्मान करण्यात येणार आहे. 

यामध्ये भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला तसेच देविदास सौदागर यांच्या उसवण कादंबरीची निवड करण्यात आली आहे. उसवणसाठी देविदास सौदागर यांना मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार आणि भारत सासणे यांना बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. दरम्यान या पुरस्कारांचे स्वरुप हे ५० हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे असणार आहे. 
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २३ सदस्यांच्या संमनीनंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठी, नेपाळीसह २४ भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. दरम्यान साहित्य अकादमीच्या या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेतील दोन साहित्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी कवितासंग्रह, बालसाहित्य, कादंबरी यांसारख्या अनेक साहित्यांचा आणि साहित्यिकांचा समावेश करण्यात आला.