नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळ््याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने गुरुवार, दि. २० जून २०२४ रोजी जामीन मंजूर केला. राऊज एव्हेन्यू कोर्टाने एक लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला.
याआधी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळाला होता. त्यानंतर ते पुन्हा तुरुंगात हजर झाले होते. आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर आता केजरीवाल तिहार जेलमधून उद्या म्हणजेच शुक्रवारी २१ जून रोजी बाहेर येऊ शकतील. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना मद्य घोटाळ््याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केले आहे. ईडीने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा अंतरिम जामीन दिला होता. त्यांनी जामीन वाढवण्याची विनंती केली होती. पण तेव्हा कोर्टाने निवडणूक झाल्यानंतर पुन्हा शरण येण्यास सांगितले होते. निवडणुका झाल्यानंतर ते २ जून रोजी तिहार तुरुंगात शरण आले.