कर्नाटकात गुलाबाचे सर्वाधिक उत्पादन
नवी दिल्ली : गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गुलाबाच्या फुलांना विशेष महत्व आहे. दि. १२ जून हा राष्ट्रीय लाल गुलाब दिवस आहे. गुलाब लागवडीत भारताचा जगात अव्वल क्रमांक लागतो. गुलाबाच्या माध्यमातून अनेक उत्पादने तयार केली जातात. ज्यामध्ये गुलाबपाणी, गुलकंदपासून ते कन्नौज आणि हसयानच्या प्रसिद्ध परफ्यूमपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
सर्वाधिक लागवड कर्नाटकात
देशात सर्वाधिक गुलाबाची लागवड ही कर्नाटक राज्यात केली जाते. कर्नाटक अव्वल स्थानावर आहे. कर्नाटकाने २०२२ मध्ये फुलांचे उत्पादन दुप्पट करून १,७१,८८० टन केले, जे २०१८ मधील ७६,९१० टन होते. बंगळुरूचा डच गुलाब खूप लोकप्रिय आहे. परदेशात जाणा-या गुलाबांमध्ये कर्नाटकचा मोठा वाटा आहे.
कोट्यवधींची उलाढाल
दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात गुलाबाची लागवड केली जाते. परदेशातही मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात होते. त्यामुळे दरवर्षी गुलाबाच्या फुलातून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.