वॉशिंग्टन : कोपा अमेरिका आणि पॅरिस ऑलिम्पिक पाठोपाठ येत असल्याने अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली असून, त्यासंबंधीचा निर्णय १३ जून २०२४ रोजी जाहीर केला. त्यामुळे विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाला मेस्सीशिवाय खेळावे लागणार आहे.
३६ वर्षीय मेस्सी २० जून ते १४ जुलैदरम्यान अमेरिकेत होत असलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी खेळणार आहे. त्यानंतर लगेचच २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. त्यामुळे मेस्सीने ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास नकार दिला.
तिस-या क्रमांकाचा
श्रीमंत फुटबॉलपटू
लिओनेल मेस्सी सर्वाधिक कमाई करणारा जगातील तिस-या क्रमांकाचा फुटबॉलपटू आहे. त्याची १३५ मिलियन डॉलर्सची कमाई आहे. यात मैदानातील कमाई ६५ मिलियन डॉलर तर मैदानाबाहेरील कमाई ७० मिलियन डॉलर आहे. अर्थात, मैदानापेक्षा त्याची मैदानाबाहेरील कमाई अधिक आहे.