नागपूर : नागपूरची १८ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने गुरुवार, दि. १३ जून रोजी मुलींची वर्ल्ड ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली. गुजरातमध्ये झालेल्या या स्पर्धेत दिव्याने अंतिम फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव्हा क्रास्तेव्हाचा पराभव केला. टॉप सिडेड दिव्याने ११ पैकी १० गुण पटकावले. ती ९ सामन्यांत विजयी झाली तर दोन सामने ड्रॉ झाले. खुल्या विभागात कझाकिस्तानच्या काझयबेक वोगेरबेकने विजेतेपद पटकावले. त्याने शेवटच्या फेरीत अर्मेनियाच्या मामिकोनचा पराभव केला. गुजरात असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती.