नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा अलिकडे जगात डंका वाजत आहे. परंतु यामागे देशातील १८ राज्यांचे प्रमुख योगदान आहे. देशात ३६ राज्ये आहेत. परंतु यापैकी ५० टक्के राज्यांचा देशातील उत्पन्नाचा वाटा केवळ १० टक्के आहे, तर उर्वरित अर्ध्या राज्यांचा वाटा ९० टक्के आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने हा अहवाल जारी केली आहे. विशेषत: भारताच्या एकूण उत्पन्नापैकी १८ राज्यांमधून ९० टक्के उत्पन्न येते.
चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये देशातील शीर्ष १८ राज्यांचा महसूल ८ ते १० टक्क्यांनी वाढून ३८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनात या १८ राज्यांचा वाटा ९० टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) या राज्यांच्या महसुलात ७ टक्क्यांनी वाढ झाली, असा दावाही एजन्सीने केला. ही वाढ प्रामुख्याने मजबूत जीएसटी कलेक्शन आणि केंद्राकडून होणा-या अर्थसाह्यामुळे होईल. राज्याच्या एकूण महसुलात मद्यविक्रीतून मिळणा-या महसुलाचा वाटा १० टक्के आहे.