जिंदाल, बबुताचे पदक हुकले

yongistan
By - YNG ONLINE
अंतिम फेरीत पराभव, बबुताला थोडक्यात धक्का 
पॅरिस : वृत्तसंस्था
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर भारताच्या नजरा आणखी दोन पदकाकडे लागल्या होत्या. १० मीटर एअर रायफल प्रकारात रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे भारताला आणखी २ पदके मिळतील, अशी आशा होती. मात्र, परंतु रमिता जिंदालला कमाल करून दाखविता आली नाही. तसेच अर्जुन बबुता अखेरपर्यंत झुंजला परंतु तो चौथ्या स्थानी राहिल्याने कांस्य पदक थोडक्यात हुकले. 
अर्जुन बबुताने पात्रता फेरीत ६३०.१ गुण मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. परंतु अंतिम फेरीत त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. खरे तर त्याने अखेरच्या क्षणापर्यंत चांगली झुंज दिली. परंतु थोडक्यात कांस्य पदक हुकले. त्यामुळे अर्जुन बबुताची निराशा झाली. रमिता जिंदालनेही नेमबाजीत अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु अंतिम फेरीत ती दबावात खेळली. त्यामुळे तिलाही पराभवाचा सामना करावा लागला.  
बॅडमिंटन दुहेरीत धक्का
बॅडमिंटन महिला दुहेरीत भारताच्या  अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रास्तो यांना सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या जोडीला जपानच्या नामी मतसुयामा आणि चिहारा शिदा यांनी २१-११ आणि २१-१२ ने पराभूत केले. 
तिरंदाजीतही निराशा
तिरंदाजीत दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत या महिला तिरंदाजांनी रविवारी निराशा केली. त्यानंतर भारताच्या पुरुष तिरंदाजांनाही पॅरि ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय तिरंदाजांनी अपेक्षाभंग केला.