-१९९६ हे आधुनिक ऑलिम्पिकचे शताब्दी वर्ष होय.
-जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान अहमदाबाद येथे आहे.
-क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय खेळाडू रणजितसिंग हे होय.
-श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे.
-बुद्धीबळाची सुरुवात भारतात झाली.
-ऑस्ट्रेलियाने सलग सोळा कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला.
-कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू हरभजनसिंग हा होय.
-सुनील गावसकर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सात वेळा शून्यावर बाद झाला.
-चेतन शर्मा हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रिक नोंदविणारा पहिला भारतीय खेळाडू होता.
-अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
- पी.टी. उषा हीस 'भारताची सुवर्णकन्या' असे सुद्धा म्हणतात.