राहुल गांधींच्या टीकेनंतर सरकारची घोषणा
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्नीवीर धोरणावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर केंद्र सरकारने लष्करी सेवेत असताना मृत्यू झालेल्या अग्नीवीराच्या कुटुंबीयाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल, अशी घोषणा केली.
यामध्ये ४८ लाख रुपयांच्या विम्याचा समावेश आहे. ज्यासाठी अग्निवीरांकडून कोणतेही पेमेंट घेतले जात नाही. ४४ लाख रुपये अनुग्रह सेवा सुमारे ११.७० लाख रुपयांचा निधी पॅकेज आणि सेवा कालावधीसाठी शिल्लक असलेले वेतन याशिवाय अग्नीवीरांसाठी ५० लाख ते १ कोटी रुपयांचे विमा संरक्षणदेखील आहे. ज्यासाठी सरकारने विविध बँकांशी करार केला असून, विम्यासाठी अग्नीवीरांना कोणताही प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही.