अण्णाभाऊ साठे हे एक अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावीत झाले होते. त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केले होते. अण्णा भाऊ साठेचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचा जन्म १ आगस्ट १९२० रोजी झाला होता. त्यांचा जन्म सांगलीचा. ते समाजसुधारक, लोककवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी आजही जगतात गाजत आहे. १ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती. या निमित्त हा लेखनप्रपंच
अण्णा हे आंबेडकरवादी व मार्क्सवादी विचारसरणीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला व नंतर ते आंबेडकरवादी झाले. ते शिक्षण शिकले नाही. अर्थात कोणत्याच शाळेत गेले नाही. तरीही ते शाहीर, कादंबरीकार व कथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आईचे नाव वालबाई होते तर पत्नीचे नाव जयवंता. त्यांच्या पत्नीला कोंडाबाईदेखील म्हणत असत. अण्णा हे मातंग समाजाचे असून त्या काळी होत असलेल्या भेदभावाचे चटके ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना बसले. म्हणून की काय, अण्णा फक्त दिड दिवसच शाळेत गेले व नंतर शाळा सोडून दिली. पण अण्णांनी एकूण ३५ कादंब-या लिहिल्या. त्यामधीलच फकिरा एक. ती १९५९ मध्ये लिहिली. त्यांनी शाहिरीदेखील केली नव्हे तर शाहिरीतूनही त्यांनी जगाचे उद्बोधन केले. फकिरामध्ये ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या विरुद्ध लढणारा नायक उभा केला. ज्या नायकाला ब्रिटिश सरकार शेवटी फाशी देताना दाखवले आहे.
१६ आँगस्ट १९४७ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीने उग्र रूप धारण केले. त्या अंतर्गत मुंबईत २० हजार लोकांचा ए आझादी झुटी है, देश कि जनता भूखी है! अशा घोषणा देत विराट मोर्चा निघाला. त्यात अण्णाभाऊ अग्रस्थानी होते. याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा लिहिला. अत्यंत कमी काळात या पोवाड्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आपल्या जेमतेम, खडतर परिस्थितीत आणि अत्यंत कमी कालावधीत अण्णा भाऊंनी लेखनकार्यासाठी अक्षरश: स्वत:ला झोकून दिले.
अण्णा भाऊंच्या लेखणीतून ३५ पेक्षा जास्त कादंब-या, ८ लोकनाट्ये, १० कथासंग्रह, ३ नाटके, अनेक पोवाडे, लावण्या आणि विशेष म्हणजे माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन लिहून मराठी वाड्मयात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या सर्वच बाबींचा कळस म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या ७ पेक्षा जास्त कादंब-यांवर मराठी चित्रपट निर्माण झाले. अत्यंत कमी काळात अण्णा भाऊंचे वाड्मय हे उपेक्षित-वंचित-शोषित लोकांचा आवाज बनले. फकिरा, वारणेचा वाघ, रत्ना, रूपा, वैजायंता, वैर या कादंब-यांनी लेखन क्षेत्रात आपला मानदंड प्रस्थापित केला. आजसुद्धा त्यांच्या तोडीच्या, धावत्या वर्णनाच्या आणि हुबेहूब चित्रण करणा-या कादंब-या मराठी साहित्यात दुर्मिळच!
अण्णा भाऊंच्या कादंबरीतील गरिबी, दारिद्रय आणि संघर्ष करणा-या उपेक्षित-वंचित लोकांचा जीवनवृतांत वाचकांना सहजतेने अंतर्मुख करून जातो. अण्णा भाऊ हे भाषण आणि गायनातही मोठे प्रसिद्ध होते. त्यांच्या पहाडी आवाजात गायिलेला पोवाडा ऐकला की श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे! ते प्रसिद्ध लोककलावंत म्हणून गाजलेले असताना १९५८ साली झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे क्रांतिकारी शब्द काढून येथील प्रस्थापितांना हादरवून टाकले. त्यांच्या माझी मैना गावावर राहिली सारख्या काही लावण्या आजही तेवढ्याच लोकप्रिय असून लोकांच्या चिंतनाचा विषय होत असतात.
अण्णा कुशल राजकारणीच नाही तर एक थोर समाजसुधारकही होते. त्यांचा सुधारकाचा ंिपड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते अशिक्षित जरी असले तरी त्यांनी जे विपूल लेखन केले. अण्णा हे काही जास्त दिवस जगले नाहीत. ते १८ जुलै १९६९ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी मरण पावले. परंतु ते अल्प काळ जरी जगले असतील तरी त्यांनी केलेले कार्य हे इतरांना लाजवेल असेच आहे.
अंकुश शिंगाडे, नागपूर