आज स्वीकारणार पदभार
नवी दिल्ली : यूपीएससी बोर्डाच्या चेअरमनपदी एका डॅशिंग महिला अधिका-याची नियुक्ती करण्यात आली. प्रीती सुदन गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. कर्नाटक केडरच्या १९८३ सालच्या आयएएस अधिकारी असलेल्या प्रीती सुदन यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे.
प्रीती सुदन या कर्नाटक केडरच्या आयएएस अधिकारी असून हरयाणाच्या रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे १९८३ सालच्या बॅचच्या अधिकारी राहिलेल्या सुदन ४ वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्या आहेत. आपल्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या अनेक विभागात त्यांनी डॅशिंग कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातही त्यांनी मोठी जबाबदारी निभावली. त्यासह संरक्षण मंत्रालयाच्या सचिव, खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग, आरोग्य विभागाच्या सचिवपदीही त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनी कोविडच्या महामारीत रणनीतीकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
बेटी बचाओ, बेटी पढाओ, आयुष्यमान भारत योजना यांसह राष्ट्रीय आरोग्य आयोग, एलाईड हेल्थ प्रोफेशनल आयोग आणि ई-सिगारेटवर प्रतिबंधन कायद्या बनवण्याचे क्रेडिटही प्रीती सुदन यांनाच दिले जाते. यूपीएससीची प्रमुख बनणा-या त्या दुस-या महिला आहेत. अध्यक्ष महेश सोनी यांनी अचानक आपला राजीनामा दिल्याने प्रीती सुदन यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.