रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : भारताला टी-२० चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा पुरस्कार पटकावला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार २०२३-२४ मध्ये ‘पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीची वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून निवड करण्यात आली तर २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी घेणारा मोहम्मद शमी, वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडला गेला. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध ७१२ धावा करणा-या यशस्वी जैस्वालला वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी फलंदाज म्हणून निवडण्यात आले, तर आर. अश्विनची वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. 
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना क्रीडा प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. यादरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले की, भारतीय संघ भविष्यात आणखी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.
कोणत्या प्रकारात कोणाला मिळाले पुरस्कार
जीवनगौरव पुरस्कार : राहुल द्रविड
पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेट : रोहित शर्मा
एकदिवसीय फलंदाज : विराट कोहली
एकदिवसीय सर्वोत्तम गोलंदाज : मोहम्मद शमी
पुरुष कसोटी फलंदाज : यशस्वी जैस्वाल
पुरुष कसोटी गोलंदाज : रविचंद्रन अश्विन
टी-२० वर्षातील सर्वोत्तम फलंदाज : फिलिप सॉल्ट
टी-२० बॉलर ऑफ द इयर : टीम साउथी
डोमेस्टिक क्रिकेट ऑफ द इयर : साई किशोर
महिला सर्वोत्तम फलंदाज : स्मृती मानधना
महिला वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज : दीप्ती शर्मा
क्रीडा प्रशासन : जय शहा