नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगटच्या पदकाची याचिका फेटाळल्याने कुस्तीपटू नाराज आहेत. मात्र, भारताच्या युवतींनी १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवार, दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी ४ सुवर्णपदकांची कमाई केली.
अदितीने २०२४ च्या जागतिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तिने ४३ किलो वजनी गटात फायनलमध्ये ग्रीसच्या मारिया लोईसा ग्किकाचा ७-० असा सहज पराभव केला. जॉर्डन येथे ही स्पर्धा सुरू आहे. ५७ किलो वजनीगटात नेहाने निर्विवाद वर्चस्व गाजविताना भारतासाठी दुसरे सुवर्णपदक निश्चित झाले. तिने जपानच्या सो त्सुत्सुईचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. ६५ किलो वजनी गटात अम्मानने अटतीच्या लढतीत डारिया फ्रोलोव्हाचा ६-३ असा पराभव करून तिसरे सुवर्णपदक निश्चित केले. ७३ किलो वजनी गटात मानसी लाथेरने ५-० अशा फरकाने हॅन्ना पिर्स्कायाचा पराभव केला.