नवी दिल्ली : भारत यावेळी प्रथमच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार आहे. मागच्या वर्षीच २३ ऑगस्ट रोजी भारताने आपले अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले होते. यासह असे करणारा तो पहिला देश ठरला आहे. हा दिवस भारतासाठी खूप खास होता. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’म्हणून घोषित केला होता. त्यानंतर या वर्षी प्रथमच राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एक विशेष थीमही ठेवण्यात आली आहे. यावेळी चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे ही थीम आहे. यानिमित्ताने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी देशाची राजधानी दिल्लीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
२३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान ३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग केले. यासह भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला आहे. इतकेच नाही तर चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यानिमित्ताने देशात आनंदाची लाट उसळली होती. भारतातील प्रत्येक व्यक्तीला हा दिवस आणखीनच अभिमानास्पद वाटत होता. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला होता. भारत सरकारने आयोजित केलेल्या या मेगा इव्हेंटमध्ये लोकसहभागाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी इस्रोनेही विशेष तयारी केली आहे. या निमित्ताने शास्त्रज्ञ आणि अभियंते आपले अनुभव जगासमोर मांडणार आहेत.
........................