जागतिक शेअर बाजारात भूकंप

yongistan
By - YNG ONLINE
गुंतवणूकदारांचे १७ लाख कोटी रुपये पाण्यात!
मुंबई : वृत्तसंस्था
अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदी आणि जागतिक शेअर बाजारात गोंधळाची स्थिती असताना भारतीय शेअर बाजार ५ ऑगस्ट २०२४ रोजी उघडताच कोलमडून पडला. बीएसई सेन्सेक्स २४०१.४९ अंकांनी घसरून ७८,५८०.४६ वर पोहोचला. त्याचवेळी, निफ्टीमध्ये ४८९.६५ अंकांची घसरण झाली आणि तो २४,२२८.०५ अंकांवर पोहोचला. आज गुंतवणूकदारांना १७.०३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपन्यांचे मार्केट कॅप ४४०.१३ लाख कोटी रुपयांवर आले आहे. मागील सत्रात ते ४५७.१६ लाख कोटी रुपयांवर होते.
जागतिक बाजारातही घसरण
आशियाई बाजारात आज घसरण झाली. जपानचा निक्केई ७ टक्क्यांपेक्षा जास्त खाली आला. त्याचवेळी हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.२२ टक्के खाली आला. चीनचा शांघाय कंपोझिटदेखील ०.०६ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार डाऊ जोन्स १.५१ टक्के घसरून बंद झाला.