१३ लाख विद्यार्थ्यांचे विदेशात शिक्षण

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परदेशात शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. १३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत.

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, रशिया, इस्रायल आणि युक्रेनसह १०८ देशांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली. सध्या १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. २०२३ मध्ये हा आकडा १३,१८,९५५ होता, तर २०२२ मध्ये हा आकडा ९,०७,४०४ होता. कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, चालू वर्षात १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थ्यांपैकी कॅनडात ४,२७,०००, अमेरिकेत ३,३७,६३०, चीनमध्ये ८५८०, ग्रीसमध्ये ८ , इस्रायलमध्ये ९००, पाकिस्तानात १४ आणि युक्रेनमध्ये २५१० विद्यार्थी शिकत आहेत. भारत सरकार व्हिसा फ्री एंट्री ट्रॅव्हल, व्हिसा ऑन अरायव्हल यासारख्या सुविधा देऊ शकतील, अशा देशांची संख्या वाढवण्यासाठी भारतीयांना जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.