ढाका : आरक्षणाच्या मुद्यावर सध्या बांगलादेश जळत आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनीसुद्धा बांग्लादेशला रामराम ठोकत पलायन केले. अशातच आता शेख हसीना पुढे वास्तव्यासाठी कोणत्या देशात आश्रय घेणार अशी चर्चा रंगू लागली आहे. पण सध्या शेख हसीना त्यांची बहीण रेहाना शेख हिच्यासोबत लंडनला जाण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. आता जे काही बंड घडले. इतिहासात तर यापेक्षा अधिक निर्दयीपणे मारले गेले आहे. शेख हसीना त्याच राजकीय बळी ठरलेल्या कुटुंबाच्या सदस्य आहेत.
शेख हसीना यांच्या शेख रहेना लहान बहीण आहेत. १९७५ मध्ये झालेल्या बांग्लादेशाच्या दंगलीत शेख हसीना यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली होती. बांग्लादेशमध्ये त्यावेळीही अशीच एका स्थानिक मुद्यावर दंगल उसळली होती आणि संतप्त जमावाने शेख हसीना यांच्या आई-वडिलांसह त्यांच्या तीन बहिणीची हत्या केली होती. त्याचवेळी शेख हसीना त्यांच्या पतीसह आणि बहीण शेख रेहानासह जर्मनीत होत्या म्हणून त्या तिघांचा जीव वाचला.
शेख रेहाना यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५५ मध्ये बांग्लादेशचे पिता म्हणून ओळख असलेले शेख मुजीबुर यांच्या घरी झाला होता. शेख रेहाना यांचे शिक्षण शाहीन स्कूलमधून झाले. १९७१ मध्ये जेव्हा बांग्लादेशचा मुक्तीसंग्राम सुरु झाला तेव्हा शेख रेहाना यांना नजरबंद करण्यात आले होते. १९७५ मध्ये संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्यानंतर शेख रेहाना बांग्लादेशात परत आल्या. प्रत्यक्ष जरी राजकरणात रेहाना उतरल्या नसल्या तरी पडद्यामागून त्यांनी अनेक निर्णय घेतल्याची माहिती मिळते.
१० मे १९७९ मध्ये ऑल युरोपीय बकशाल समारोहात शेख रेहाना यांनी केलेल्या भाषणाने त्यांना जगात ओळख मिळवून दिली. शेख रेहाना यांचे लग्न शफीक सिद्दीकी सोबत यांच्यासोबत झाले आहे. शफीक सिद्दीकी यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान मानले जाते. शफीक सिद्दीकी आणि शेख रेहाना यांना तीन मुले आहेत. एक मुलगा आणि दोन मुली. मुलाचे नाव रादवान सिद्दीकी मुलीचे नाव तुलीप आणी अजमीना असे आहे. राजवान सिद्दीकी ढाकात एका रिसर्च संस्थेत काम करतात तर तुलीप सिद्दीकी युकेतील लेबर पार्टीच्या खासदार आहेत. तर तिसरी मुलगी अजमीना कंट्रोल रिस्कमध्ये कार्यरत आहेत.