चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चेन्नई येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठला. बुमराहने पहिल्या डावात शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. बुमराहने हरभजन सिंगला मागे टाकले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात ९ धावा करत खेळत असलेल्या हसन महमूदला विराट कोहलीकरवी झेलबाद करताच बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट्स पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा बुमराह सहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. आता या महान खेळाडूंच्या यादीत बुमराहही सामील झाला आहे.
सर्वाधिक विकेट घेणारे
भारतीय वेगवान गोलंदाज
६८७ : कपिल देव
६१० : झहीर खान
५५१ : जवागल श्रीनाथ
४४८ : मोहम्मद शमी
४३४ : इशांत शर्मा
४०० : जसप्रीत बुमराह