रॉबिन फ्रान्सिसने पटकावले कांस्य पदक

yongistan
By - YNG ONLINE
पॅरिस : वृत्तसंस्था 
रुबिना फ्रान्सिसने चमकदार कामगिरी करत पॅरालिम्पिक २०२४ च्या तिस-या दिवशी पाचवे पदक जिंकून दिले. रुबिनाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएचवन फायनलमध्ये २११.१ स्कोअरसह कांस्यपदक जिंकले. रुबिनाने पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावले होते. मात्र, तिने अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. या पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे.
२५ वर्षीय रुबिना पात्रता फेरीत अव्वल आठ नेमबाजांपेक्षा मागे पडली होती. पण तिने शेवटी वेग दाखवला आणि पदकाची शर्यत गाठली. तिने पात्रता फेरीत ५५६ गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मध्य प्रदेशातील ही नेमबाज तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिली होती. पण पॅरिसमध्ये रुबिनाने टोकियोचे अपयश मागे सोडत कांस्यपदक मिळवण्यात यश मिळवले. पॅरालिम्पिकमध्ये रुबीना फ्रान्सिस पिस्टल शूटिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय आहे. रुबीना फ्रान्सिसने एकूण २२ नेम लावले आणि २११.१ स्कोअर केला.