आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचे लोकार्पण

yongistan
By - YNG ONLINE
- नवी मुंबईत बनले इस्कॉन मंदिर
मुंबई : नवी मुंबईतील खार घर येथे आशियातील सर्वात दुसरे मोठ इस्कॉन मंदिर उभारले  आहे. या मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ जानेवारीपासून सुरु झाला आणि १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. संपूर्ण संगमरवरी पांढ-या शुभ्र दगडात हे बांधकाम करण्यात आले. या मंदिराच्या सभागृहात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांना थ्रीडी फोटोंच्या आधारे दाखविण्यात आले आहे.
अडीच एकर जागेवर हे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स ( इस्कॉन) या भगवतगीतेचा प्रसार करणा-या संस्थेने या मंदिराची उभारणी केली आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर २३ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराची उभारणी करण्याास १२ वर्षे लागले. या मंदिराच्या उभारणीसाठी पांढ-या शुभ्र आणि तपकीरी रंगाच्या संगमरवरी दगडांचा वापर केला गेलेला आहे. भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित या मंदिराचे नाव श्री श्री राधा मदन मोहन असे ठेवले आहे. 
जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे
दशावतार मंदिरातील अनेक दरवाजे किलोच्या चांदीपासून बनविले आहेत. दरवाजांवर गधा, शंख, चक्र आणि ध्वज सोनेरी प्रतिमा कोरण्यात आली आहे. या मंदिराची निर्मिती ग्लोरी ऑफ महाराष्ट्र योजनेअंतर्गत झाली आहे. जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे आहेत, परंतु नवी मुंबईतील हे एकमेव मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक प्रभुपादजी यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.
युद्धनौकांचे राष्ट्रार्पण
मुंबईच्या नौदल गोदीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी व आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रर्पण करण्यात आले.