५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. गवई यांची नियुक्ती

yongistan
By - YNG ONLINE
१४ मे रोजी घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
नवी दिल्ली : न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची ५२ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ते येत्या १४ मे रोजी मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. ते निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे उत्तराधिकारी या पदावर विराजमान होणार आहेत. बी. आर. गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. १४ मे रोजी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गवईंना पदाची शपथ दिली.
भूषण रामकृष्ण गवई यांचा २४ नोव्हेंबर १९६० ला महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात जन्म झाला. त्यांनी १६ मार्च १९८५ ला त्यांनी वकिलीच्या क्षेत्रात पदार्पण केले. पुढे ते १२ नोव्हेंबर २००५ ला उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायाधीश पदावर विराजमान झाले. तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक घटनापीठांचे सदस्य राहिले आहेत, त्यांनी आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निकाल दिले आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मोठ्या निर्णयाला मान्यता देणा-या ५ सदस्यीय खंडपीठाचे ते सदस्य होते. ज्यामुळे ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या उपस्थितीत झाला. त्यासोबतच राजकीय निधीसाठी वापरले जाणारे निवडणूक रोखे योजनेला रद्द ठरवणा-या ५ सदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.