ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा अल्बानीज

yongistan
By - YNG ONLINE
मेलबर्न : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ँथनी अल्बानिज यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सलग दुस-यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. देशाच्या राजकारणात २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान पंतप्रधानाला सलग दुस-यांदा सत्ता स्थापन करण्याच संधी मिळाली. त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पीटर डटन यांचा पराभव केला.
ऑस्ट्रेलियात शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान झाले. देशात मतदान सक्तीचे आहे. ऑस्ट्रेलियन संसदेत दोन सभागृह आहेत. वरिष्ठ सभागृहाला सिनेट म्हणतात, तर कनिष्ठ सभागृहाला प्रतिनिधीहगृह म्हणतात. भारताप्रमाणे कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळविणा-या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो. यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे महागाई आणि निवारा हे मुख्य प्रश्न ठरले. शनिवारी सकाळी १५० जागांसाठी मतदान झाले.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ँथनी अल्बानीज यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांची पुनर्निवड ऑस्ट्रेलियन जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला शाश्वत विश्वास दर्शवते. ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अल्बानिज यांनी विजयी झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियन जनतेने तुमच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे तुम्हाला पुन्हा निवडून दिले असे पंतप्रधान मोदी म्हणाले.