इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन सुरु आहे. त्यात पाकिस्तानला युद्धाची जास्त खुमखुमी आली आहे. पाकिस्तानने शनिवारी त्यांच्या नवीन मिसाइलची चाचणी केली. हे बॅलेस्टिक मिसाइल असून त्याची रेंज ४५० किलोमीटर आहे. अब्दाली नावाचे हे बॅलेस्टिक मिसाइल असून ही चाचणी यशस्वी झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या सोनमियानी रेंजमध्ये ही चाचणी करण्यात आली. आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेज कमांड अंतर्गत ही चाचणी करण्यात आली. आॅपरेशनल यूजर ट्रायलचा हा भाग होता.
आपण आपल्या देशाचे संरक्षण करु शकतो, याची नागरिकांना खात्री पटवून देण्यासाठी ते फायटर जेट्सने युद्ध सराव करतायेत. रणगाड्यांमधून मारक क्षमता दाखवत आहेत. पाकिस्तानचा हा सर्व प्रोपगंडा प्रचार सुरु आहे. वास्तवात त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता युद्ध झाल्यास ते जास्त दिवस टिकाव धरु शकणार नाहीत. भारताच्या सैन्य क्षमतेसमोर पाकिस्तान बराच मागे आहे. मात्र, तरीही ते युद्धाच्या पोकळ डरकाळ््या फोडत आहेत.
अब्दाली वेपन सिस्टमच्या नावाने ओळखल्या जाणाºया या मिसाइलच परीक्षण मिलिट्री ड्रिल ह्यएक्सरसाइज इंडसह्ण अंतर्गत करण्यात आले. या चाचणीदरम्यान पाकिस्तानी सैन्याचे स्ट्रेटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनेंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रेटेजिक प्लांस डिवीजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेज बट उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कूटनीतिक कारवाइनंतर पाकिस्तान सतत नोटम जारी करुन क्षेत्रात मिसाइल चाचणीची धमकी देत आहे.
ग्लोबल फायरपावर
रँकिंगमध्ये भारताचे स्थान
पाकिस्तान आर्म्ड फोर्सच्या मीडिया आणि पब्लिक रिलेशन विंग इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सनुसार या मिसाइल परीक्षण चाचणीचा उद्देशा सैन्याची युद्ध तयारी सुनिश्चित करणे आणि मिसाइलच्या मॉडर्न नेविगेशन सिस्टमसह प्रमुख तंत्रज्ञान निकष चेक करणे होते. ग्लोबल फायरपावर रँकिंगनुसार सैन्य शक्ति आणि शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये जगातील १४५ देशात भारत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान १२ व्या नंबरवर आहे.